Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : जेईई बी.आर्च. परीक्षेत खेडच्या जिया मेहताची राष्ट्रीय स्तरावर चमक, भारतात द्वितीय क्रमांक पटकावला

banner 468x60

खेड शहरातील रोटरी इंग्लिश मिडिअम School च्या विद्यार्थिनी जिया मेहता हिने राष्ट्रीय स्तरावरील जे.ई.ई. बी.आर्च. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे. एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जियाने जनरल-इडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये भारतात द्वितीय क्रमांक पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

जियाने या परीक्षेत तब्बल ९९.९७ पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. देशातील अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या जेईई बी.आर्च. परीक्षा मध्ये इतक्या उच्च स्थानावर झेप घेणे ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे. तिच्या या यशामुळे खेड शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात आनंद आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जियाच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि कठोर मेहनत हे महत्त्वाचे घटक ठरले. अभ्यासाबरोबरच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना जियाने व्यक्त केली आहे. लहानपणापासूनच वास्तुरचना आणि डिझाईन क्षेत्राची आवड असल्याने तिने बी.आर्च. क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी तिने नियमित सराव, मॉक टेस्ट आणि वेळेचे अचूक नियोजन यावर विशेष भर दिला.

या यशामागे उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राध्यापक रोहन खेडेकर, मानसी देवघरकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ, राजेश जाधव आणि अनिल सिंग यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तिच्या यशात पालकांचे प्रोत्साहन आणि मानसिक आधारही महत्त्वाचा ठरला.

संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे यांनी जियाच्या यशाचे कौतुक करत हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका भूमिता पटेल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जियाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खेडसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिया मेहतामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या या यशामुळे खेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आणखी उंचावला असून, भविष्यात ती आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *