Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : जगबुडी पुलावर एसटी बस–पिकअपची समोरासमोर धडक

banner 468x60

खेड तालुक्यातील खेड–आंबवली मार्गावर कुडोशी येथील जगबुडी पुलावर बुधवारी दुपारच्या सुमारास एसटी बस आणि पिकअप वाहनामध्ये समोरासमोर जोरदार अपघात झाला. या धडकेचा आवाज दूरपर्यंत घुमल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

banner 728x90


प्राथमिक माहितीनुसार, जगबुडी पूल अत्यंत अरुंद असल्यामुळे दोन्ही बाजूंनी एकाच वेळी येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होतात. बुधवारी दुपारी एसटी बस आणि पिकअप वाहन समोरासमोर येत असताना चालकांचा अंदाज चुकला आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच गंभीर दुखापतही टळली. मात्र काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. अपघातानंतर काही क्षणांसाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच खेड पोलीस आणि एसटी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पुल अरुंद असल्यामुळे अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने काही वेळानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.


भरणे नाका येथील श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज होती. अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.


दरम्यान, जगबुडी पुलाच्या अरुंद रचनेमुळे वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे या पुलाचे रुंदीकरण करणे किंवा पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *