Breaking News
रत्नागिरी : अशीही फसवणूक, “तुमचे गॅस बिल अपडेट झालेले नाही. त्यामुळे आजच तुमचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल,”फसवणुकीचा नवा फंडा, गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोबाईल हॅक करून खात्यावर डल्ला चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

खेड : दोन मंदिरे फोडली, चोरट्यांनी पितळेच्या 14 घंटा चोरल्या

Screenshot

banner 468x60

खेडमधील चाेरट्यांनी आपला माेर्चा मंदिरांकडे वळविला असून, गेल्या दाेन दिवसांत खेड तालुक्यातील दाेन मंदिरांमध्ये चाेरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चाेरल्या आहेत. त्याचबराेबर धातूच्या अन्य वस्तूही चाेरून नेल्या आहेत.

banner 728x90

या चाेऱ्या शिरगाव खुर्द शिवाजीनगर येथील काळकाई देवी आणि कुळवंडी येथील शिवशंकर मंदिरात झाल्या असून, तब्बल ३७,८०० रुपयांचा मुद्देमाल चाेरीला गेला आहे. शिरगाव खुर्द येथील चाेरीबाबत प्रभाकर राजाराम भाेसले (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही चाेरी शनिवारी सायंकाळी उघडकीला आली. येथील काळकाई देवीचे मंदिर कायम उघडेच असते. या मंदिरातील पितळेच्या प्रत्येकी पाच किलाे वजनाच्या तीन घंटा चाेरट्याने चाेरून नेल्या आहेत.

त्याचबराेबर प्रत्येकी पाच किलाे वजनाचे पितळेचे दाेन नामणदिवे (समई) आणि सीसीटीव्हीचा एक डीव्हीआर असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल चाेरून नेला आहे.
कुळवंडी येथील शिव शंकर मंदिरात चाेरी झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी मनाेहर महादेव जंगम (वय ५२, रा. कुळवंडी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पितळेच्या ११ घंटा चाेरीला गेल्या आहेत. त्यामध्ये १२ किलाे वजनाची एक आणि प्रत्येकी २ किलाे वजनाच्या दहा घंटांचा समावेश आहे. त्याचबराेबर तीन पितळी धातूच्या समई, तांब्याचा नाग, गळती, दाेन टाेप आणि ताम्हण असा एकूण १७,८०० रुपयांचा मुद्देमाल चाेरट्याने चाेरून नेला आहे. गेल्या काही महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या भागात मंदिरांमधील धातूच्या घंटा व इतर साहित्य चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या धातूच्या वस्तूंना बाजारात चांगली किंमत आहे. त्यामुळे या वस्तूंची चाेरी करून त्या माेडीत विकण्यासाठी चाेरी हाेत असल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *