मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शहरातील उद्योजक उत्तमकुमार सुखराज जैन यांच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 31 मे रोजी मध्यरात्री सुमारे 12.29 वाजता उत्तमकुमार जैन हे आपल्या टाटा नेक्सॉन (एमएच 08 बीई 8151) या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी कळंबणी येथील पंपावर गेले होते. त्या वेळी पंपावर वाहनांची मोठी रांग लागलेली होती. त्यामुळे त्यांनी आपली कार रांगेत उभी केली. मात्र गॅस भरण्यास बराच वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन रांगेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान मागून आलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारचा त्यांच्या वाहनाला घास लागल्याने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या घटनेनंतर स्विफ्ट डिझायरमधील काही व्यक्ती वाहनातून खाली उतरल्या आणि जैन यांच्याशी वाद घालू लागल्या. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. तक्रारीनुसार, संबंधितांनी जैन यांच्या कारच्या काचांवर ठोसे मारत शिवीगाळ केली आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच वाहनाच्या नुकसानभरपाईच्या नावाखाली तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
जैन यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातातील मोबाईल फोन आणि कारची चावी हिसकावून घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर सहा जणांनी जैन यांना घेराव घालत धमकावल्याचे सांगितले जाते. “आम्ही कोण आहोत हे तुला माहीत नाही, तुझा गेम करू,” अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पंपावर उपस्थित असलेल्या काही परिचितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी वाद आणखी वाढला.
संबंधितांनी जैन यांच्या कारची समोरील काच फोडल्याचा तसेच त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळानंतर मोबाईल फोन परत फेकून देत सर्व संशयित घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे कळंबणी येथील सीएनजी पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्यरात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, खेड पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*