Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

लांजा : येथे वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा, घरावरील पत्रे उडून नुकसान

banner 468x60

लांजा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका लांजा शहरातील नाभिकवाडी परिसराला बसला.

banner 728x90

नाभिकवाडी येथील मंदार मोरे यांच्या घरावरील पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने घराचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही क्षणांतच घराचे छप्पर उघडे पडले. पत्रे उडून गेल्याने घरातील फर्निचर, कपडे तसेच इतर साहित्य पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मोरे कुटुंबीयांना मदत केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे लांजा शहरातील काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना काही काळ अंधाराचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हवामानातील अचानक बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *