रत्नागिरी येथे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक ११००४ कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी उघडकीस आली असून, वातानुकूलित डब्यातील एका परिचारकाला रेल्वे संरक्षण दलाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
तपासणीदरम्यान संशयावरून संबंधित परिचारकाची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या नेल्या जात असलेल्या तब्बल ३५ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्याचाच सहभाग आढळल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित परिचारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन सतत दक्ष असून, कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तू सोबत न बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे संरक्षण दलाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














