Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मंडणगड : आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

banner 468x60

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव आंबडवे (ता. मंडणगड) येथे ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, मातोश्री हॉस्पिटल मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री व महसूल राज्यमंत्री योगेश कदम, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे, संस्था प्रतिनिधी योगेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सरपंच दीपिका जाकल, अनिता नारकर, आत्माराम नारकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान” असे गौरवोद्गार काढले. संस्था प्रतिनिधी योगेश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आणि शिबिराच्या उद्देशाचा सविस्तर परिचय करून दिला.

या शिबिरात एकूण १८५ ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. मातोश्री हॉस्पिटल मंडणगड व प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. यामध्ये डॉ. प्रदीप मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, डॉ. शाम कंकाळ, डॉ. भावठाणकर, डॉ. आसिफ खान पठाण, डॉ. संजय पिलंकर, डॉ. मंदार आदित्य राम रेगडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व सेविकांनी सहभाग घेतला.

शिबिरात मोफत औषधे, ईसीजी, आरोग्यविषयक सल्ला तसेच पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवक शशिकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कौतुक करत अभिनंदन केले. “अशा प्रकारची आरोग्य शिबिरे दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित केली जातील,” असे शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *