सह्याद्री फाउंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथे मोफत डोळे तपासणी ओपीडी आणि सर्वसाधारण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर समीर मेडिकल, गोलकोट रोड, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात येणार असून, ऑप्टोमेट्रिस्ट डॉ. रवींद्र बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच कोणत्याही फ्रेमचा चष्मा केवळ २०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मोतीबिंदूच्या रुग्णांसाठीही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून पात्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, रुग्णांच्या येण्या-जाण्याचा खर्च हॉस्पिटलमार्फत केला जाणार आहे. मात्र, लेन्सचा खर्च रुग्णाला करावा लागणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय सर्वसाधारण आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच हाडे व सांधेदुखीची तपासणी करण्यात येणार आहे.
या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशन आणि सेवासदन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.
स्थळ : समीर मेडिकल, गोलकोट रोड, चिपळूण
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
संपर्क : ९१४६४१६३३३ / ७०८३३९४४३७

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













