Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

लांजा : शिकारीसाठी दबा धरलेल्या दोघांना अटक, बंदूक व काडतुसे जप्त

banner 468x60

लांजा शहरातील देवराई परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी बंदूक घेऊन टपून बसलेल्या दोन संशयितांना लांजा पोलिसांनी बुधवारी दुपारी अत्यंत शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे संभाव्य वन्यजीव शिकार टळली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, देवराई येथील गोपाळकृष्ण मंदिराजवळ नदीपलीकडील झुडपांमध्ये दोन व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, नितेश राणे तसेच चालक नाना डोलरेकर यांच्या पथकाने दुपारी सुमारे १ वाजता घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.


पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेगाने हालचाल करत परिसराला घेराव घालत दोघांनाही ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरुण नारायण चौगुले (वय ४६, रा. भडे पिंपळवाडी) आणि शैलेश दिलीप मेस्त्री (वय ३३, रा. इसवली सुतारवाडी) यांचा समावेश आहे.


कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १२ बोअरची बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या शिकाऱ्यांना बाहेरून कोणी मदत केली होती का, किंवा त्यांच्यासोबत आणखी काही साथीदार होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.


पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे वन्य प्राण्यांची संभाव्य शिकार टळली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *