गुहागर :जिल्हा परिषद शाळा असगोली नं 1ला शैक्षणिक साहित्याचे वाटप

banner 468x60

असगोली : सागरपुत्र कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, व शैक्षणिक मंडळ असगोली यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असगोली नं १” या ठिकाणी वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आणि शाळेच्या विकासकामांसाठी रोख रक्कम शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी सागरपुत्र कला, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळ असगोलीचे अध्यक्ष

शिवदास धातकर, उपाध्यक्ष अमरनाथ पालशेतकर, सदस्य जयंत लाकडे, विकेश पवार, सागर रोहीलकर, नितेश नाटेकर , भालचंद्र लाकडे, दिगंबर पावरी, गणेश असगोलकर, सूचित धोपावकर, आदेश लाकडे, निखिल कटनाक, व प्रणित पालशेतकर इत्यादी सदस्य उपस्थित होते. तसेच मुख्यध्यापक वानरकर सर, झगडे सर, वारके सर, पवार सर, आठवेल मॅडम इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *