गुहागर : मुसळधार पाऊस, आरे बौद्ध विहार शेडची संरक्षक भिंत कोसळली

banner 468x60

गुहागर तालुक्यात सोमवारपासून सक्रीय झालेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून चांगलेच झोडपले.बुधवारी देखील दिवसभर धो – धो कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

banner 728x90


मंगळवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला. वादळी पावसाने येथील विद्युत पुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता.रात्री धो धो कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून देखील आपला जोर कायम ठेवत येथील जनजीवन विस्कळीत करून टाकले.अनेक शेतकऱ्यांनी या पावसाने आपली शेतीची लावणीची कामे सुरू केली.
या पावसाने आरे लुंबिनी नगर मधील बौद्ध विहार शेडची संरक्षक भिंत कोसळली.

मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.गुहागर येथील दिलीप भिकाजी सावंत यांच्या घराच्या पडवीचे अंशतः नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान बुधवारी सायंकाळी देखील पावसाचा हा जोर कायम होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *