Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर : राशप कडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात

banner 468x60

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात*गुहागर – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे

. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या प्रचार करण्यावर भर देत आहेत. त्यातच 264 गुहागर विधानसभा मध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या आमदार भास्कर जाधव यांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मैदानात उतरली आहे.

शरद पवार गटाचे तालुका प्रमुख पद्माकर सदानंद आरेकर तसेच युवक तालुका प्रमुख आसिम इसाक साल्हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावोगावी फिरून जनतेच्या तसेच पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.

गुहागर विधानसभा मध्ये शरद पवार गटाचे मोठया प्रमाणावर मतदान असून पवार साहेबांना मानणारा मोठा समुदाय आहे. येणाऱ्या रविवारी 10 नोव्हेंबर ला गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाची कार्यकारणी सदस्य मिटिंग अध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *