Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरीच्या खेडमधील कन्यांची राज्यस्तरीय झेप, तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर या खेळाडूंची फेडरेशन कप कबड्डीसाठी महाराष्ट्र संघात निवड

banner 468x60

मध्यप्रदेश येथे दि. १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ५ व्या सीनियर फेडरेशन कप महिला कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन होतकरू महिला खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

अनिकेत स्पोर्ट्स क्लब, भरणे येथील तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर या खेळाडूंची महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड प्रक्रिया पार पडली होती. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तस्नीम व समरीन यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.

दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबियांचे पाठबळ आणि अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या प्रतिष्ठित फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही मोठी बाब मानली जात असून, त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडीबद्दल क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ट खेळ करत राज्याचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *