दापोली : वन्यजीव सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा, इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी संधी

banner 468x60

वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभाग दापोली आणि वाइल्ड अॅनिमल रेस्क्यू अँड रिसर्च संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वन्यजीव, पर्यावरण आणि जैवविविधतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच वन्यजीव संवर्धनाबाबत त्यांची सर्जनशीलता आणि विचारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

निबंध स्पर्धेचे विषय

विद्यार्थ्यांसाठी पुढील तीन विषय देण्यात आले आहेत—

१. घरट्यासाठी झाड शोधणाऱ्या धनेशाची गोष्ट

२. जंगल हरवलेल्या बिबट्याची गोष्ट

३. समुद्री कासवाने मला लिहिलेले पत्र

या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीवांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समस्या, अधिवासाचे महत्त्व, पर्यावरणातील बदल तसेच वन्यजीव संवर्धनाची गरज मांडता येणार आहे.

दापोली परिसरातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क : 9764454454 (व्हॉट्सअॅप)

स्थळ : दापोली

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या लेखणीतून मांडावा, असे आवाहन वनविभाग दापोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *