Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : कौटुंबिक वादामुळे मायलेकावर लोखंडी पाईपने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे कौटुंबिक वादातून मायलेकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी खेड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३० मार्च रोजी रात्री १०:३० ते ११:०० च्या सुमारास ही घटना घडली असून, परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील दुरुस्तीच्या कामावरून शिंदे कुटुंबात वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात सुरू झालेला हा वाद हळूहळू तीव्र होत गेला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या वादात आरोपी मयूर शिंदे, मयुरी शिंदे, कलावती शिंदे आणि सुप्रिया शिंदे यांनी संतापाच्या भरात फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे यांना शिवीगाळ केली.

वाद अधिकच चिघळल्यानंतर आरोपींनी आक्रमक पवित्रा घेत लोखंडी पाईपचा वापर करून अपर्णा शिंदे आणि त्यांच्या मुलावर हल्ला चढवला. या बेदम मारहाणीमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी मायलेकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फिर्यादी अपर्णा शिंदे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाऊन थेट जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाल्याने हेदली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *