Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

लांजा : टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.
या अपघातात आयशर टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *