Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

गुहागर : नवतरुण विकास मंडळाच्या पुढाकारातून काताळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

banner 468x60

नवतरुण विकास मंडळ काताळे (गोंधळकरवाडी) आणि आपली रत्नागिरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे क्रमांक १ व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

banner 728x90

शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमात अंगणवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या तसेच बाबरवाडीतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण ५४ विद्यार्थ्यांना शालेय बॅग, छत्री, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, पाटी व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शाळांना पंखा, ग्लोब, शैक्षणिक नकाशे आणि आवश्यक शैक्षणिक फलक भेट देण्यात आले.

कार्यक्रमाला काताळे व परिसरातील विविध वाड्यांमधील ग्रामस्थ, महिला वर्ग तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करंबळे गुरुजी, चव्हाण गुरुजी आणि कांबळे गुरुजी यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीची माहिती देत अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

मुंबईहून विशेष उपस्थित राहिलेले अनिल रसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिशा येद्रे व मयुरी बारस्कर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये. संदीप जोशी नरेश येद्रे,.विजय पवार,
. श्रीधर रसाळ. अनिल रसाळ,
. सचिन रसाळ,गिरीश कदम,
. संतोष बारस्कर, सदानंद बारस्कर, सखाराम बारस्कर, विनायक बारस्कर,
अशोक डिंगणकर,
. गोविंद बारस्कर, आदेश बारस्कर,
. सुधाकर दादा बारस्कर,
. भिकु बारस्कर,
. संतोष कुळये,
. शांताराम भुवड, आणि गावातील महिला वर्ग यांनी चांगली उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास बारस्कर यांनी मोफत साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिली. त्यांच्या योगदानाबद्दल मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम दिमाखात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *