रत्नागिरी : बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह सापडला

banner 468x60

रविवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी
मच्छीमारी बोटीतून मच्छी आणण्याकरिता जात असताना गावखडी खाडीत बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी हाती लागला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम युनूस पेजे (वय ५६) असे बुडून मृत्यू ओढवलेल्या मच्छीमाराचे नाव आहे. रविवारी दुपारी पेजे यांनी गावडेआंबेरे येथे एका मच्छीमाराकडे फोन करून तुझ्याकडे मच्छी उपलब्ध आहे का, अशी विचारणा केली असता त्याने आहे म्हणून सांगितल्यानंतर पेजे हे दुपारी आपली बोट घेऊन गावडेआंबेरेच्या दिशेने निघाले असता त्यांची बोट बुडाली होती. या

घटनेनंतर त्यांचा शोध सुरु असतानाचा अखेर १ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान बिर्जेवाडी परिसरामध्ये मृतदेह आढळला. त्यानंतर हा मृतदेह किनाऱ्यावर आणून रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मृतदेह अंत्यसंस्कारकरिता गावखडी येथे नेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *