Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दापोली : योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उन्हवरे दापोली मुंबई या बससेवेचा शुभारंभ

banner 468x60

दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद, कोकण एसटी प्रेमी व दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे यांच्या पुढाकाराने गेली अनेक महिने बंद असलेली फरारे मोगरेवाडी-उन्हवरे मुंबई ही बस सेवा दापोली आगराच्या वतीने सुरू करण्यात आली.


यावेळी ममता शिंदे यांनी सांगिलतेकी, बत्तीस गावांमध्ये ही बस अत्यंत उपयोगी असून, दापोली आगारातील प्रतिष्ठेची अशी ही सेवा गेली अनेक वर्ष ओळखली जाते.

मात्र कोरोनानंतर ही बस सेवा अनियमित झाली असून आता राज्यमंत्री रामदास योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे. दापोली आगाराने ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवून परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.


यावेळी माजी सभापती किशोर देसाई माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, कोकण एसटी प्रेमी राज्य उपाध्यक्ष.विकास गुरव, सचिव शैलेंद्र केळकर, उन्हवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुराद चिकटे, माजी उपसरपंच मंगेश शिंदे, वावघर पोलीस पाटील गौसिया चिकटे, मीनाज महाते, तनवीर चिकटे, आगार प्रमुख.उबाळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक.मुनाफ राजापकर, वाहतूक नियंत्रक.हर्षल नाफडे,दापोली आगाराचे चालक वाहक तसेच पत्रकार, प्रशांत कांबळे, राजेश लिंगायत,सलीम रखांगे व प्रवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *