Breaking News
दापोली : गोपाळकृष्ण पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे वैभव नाईकांची मागणी, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लांजा : 27 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, गळफास घेण्याचा केला होता प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, आमदार शेखर निकम यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली संगमेश्वर : देवरुख सुवर्णकार अपहरण-दरोडा प्रकरण- वर्षभर फरार चार आरोपी जेरबंद, चार आरोपींना कल्याण, नवी मुंबई आणि बारामतीतून अटक, गुन्ह्यातील अर्टिगा कारही जप्त

दापोली : आज महिला आणि लघु उद्योजकांनी आयोजित केलेली भव्य स्वामी ग्राहक पेठ आपल्या दापोलीत

banner 468x60

दिवाळी अगदी काही दिवसांवर आहे त्यामुळे सध्या सर्वांचा कल खरेदीकडे लागला आहे.

मात्र आपल्या दापोलीत महिला आणि लघु उद्योजकांनी भव्य स्वामी ग्राहक पेठचं आयोजन केलं आहे.

ज्यामध्ये भव्य प्रदर्शन आणि विक्री, दिवाळीची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. स्वामी ग्राहक पेठ दापोली यांनी महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ दिनांक आज 18 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिर सभागृह दापोली मध्ये आयोजित केली आहे.

त्यामध्ये ड्रेस, सोलापुरी चादर, बेडशीट टॉवेल रुमाल, गुलदस्ता, चितळे उत्पादने, पैठणी, रेशमी साड्या सावंतवाडी लाकडी खेळणी, विविध प्रकारचे लाडू, गाऊन रेडीमेड ब्लाऊज , मराठी ज्वेलरी, आकर्षक आकाश कंदील आणि इतर बरच काही या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहे.

त्यामुळे सर्व दापोलीकरांनी या स्वामी ग्राहक पेठला अवश्य भेट द्यावी असं आवाहन ग्राहकपेठच्या सदस्या तृप्ती शैलेश गुजर , अर्चना उदय खांडके आणि अर्चना वाडकर यांनी केले आहे.

स्थळ : राधाकृष्ण मंदिर सभागृह दापोली
दिनांक १८ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२४ सकाळी १०.०० ते रात्री ८.००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *