दापोली : तालुक्यात ताडील येथे घरालगत दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

banner 468x60

दापोली तालुक्यातील मौजे ताडील येथे मुसळधार पावसामुळे रविवारी ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. गावातील दशरथ चव्हाण यांच्या घरालगत ही दरड कोसळली.

banner 728x90

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. दरड घराच्या अगदी लगत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *