दापोली : सुजाण गरिकांमध्ये अशी जागरूकता हवी, दापोलीकरांनी ठेकेदाराची चांगलीच जिरवली, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल

Screenshot

banner 468x60

दापोली शहरात सध्या रस्त्यांचं काम सुरू आहे,
गल्लोगल्लीतील रस्त्यांचे काम करण्यात येत असून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर अधिकाऱ्यांचं आणि दापोली नगरपंचयातचं लक्ष नसल्याचे दिसत आहे.

या कामामुळे दापोलीतील रहिवाश्यानी संताप व्यक्त केला आहे. याआधी कोकण कट्टा न्यूजने दाभोळ मधील एका ठेकेदाराचा मुजोरपणा उतरवला होता तोच व्हिडिओ पाहून दापोलीतील नागिरकांनी कोकण कट्टा न्यूजच्या संपादकांना संपर्क करुन हा व्हिडीओ दिला आहे.


हे काम दापोली नगरपंचायतच्या अंतर्गत सुरू आहे . दापोलीतील उदनगर येथील जागृत नागरिकांनी या ठेकेदाराची चांगलीच जिरवली असून अश्या बोगस ठेकेदाराची पोलखोल केली आहे.

यात कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाही आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ आहे दापोलीतील उदयनगर हद्दीतील सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रोडच्या कामाचा.


कंत्राटदाराने या रोडचे आता डांबरीकरणाचे काम सुरु केले आहे. मात्र सदर काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने दापोलीतील ग्रामस्थांनी आणि महिलांनी काम बंद करून जाब विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *