दापोली : आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूलचा SSC 2026 परीक्षेत दैदिप्यमान निकाल

banner 468x60

दापोली तालुक्यातील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित व रामराजे कॉलेज व्यवस्थापित आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल या विद्यालयाने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत 95.12 टक्के इतका उज्ज्वल निकाल नोंदविला आहे.

banner 728x90

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर हे यश मिळवले असून संपूर्ण दापोली परिसरातून विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. त्यामध्ये —

प्रथम क्रमांक : कु. नबा इम्रान मुन्शी — 87.40 टक्के
द्वितीय क्रमांक : आदियान अफताब खोत — 86.20 टक्के
तृतीय क्रमांक : अर्श इम्रान लोरे — 81 टक्के

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास हे महत्त्वाचे घटक असल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.

विद्यालयाने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही विशेष उपक्रम राबविले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यालयाने दापोली परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, विद्यालयामध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *