Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : रामराजे महाविद्यालय, दापोली येथे विविध पदांसाठी भरती

banner 468x60

दापोली तालुक्यातील डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित रामराजे महाविद्यालय, दापोली येथे विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाविद्यालय प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार इंग्रजी विषय शिक्षक, अकाउंट/वाणिज्य शिक्षक, क्लर्क, ग्रंथपाल, शिपाई आणि वॉचमन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इंग्रजी शिक्षक पदासाठी M.A., B.Ed., अकाउंट शिक्षक पदासाठी M.Com./M.Com. B.Ed., क्लर्क पदासाठी B.A./B.Com./B.Sc. तर ग्रंथपाल पदासाठी B.Lib. किंवा M.Lib. ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

POSTS

English – M.A. B.Ed

Account – M.Com/M.Com B.Ed

Clerk – B.A./B.Com/B.Sc

Librarian – B.Lib / M.Lib

Peon
Watchman

Minimum 2 years of teaching experience preferred.

(Freshers can also apply)

अध्यापनाच्या पदांसाठी किमान दोन वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असले तरी नवोदित उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारे आकर्षक वेतन देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्रा. कुणाल मांडलिक (9028466701) किंवा श्रीमती वेदिका राणे (9527873432) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दापोली परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *