दापोली तालुक्यातील डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्सचा इयत्ता बारावीचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून एकूण निकाल ८७.१५ टक्के नोंदवला गेला आहे. महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांनी यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यामध्ये विज्ञान शाखेने आघाडी घेत ९५ टक्के निकाल नोंदवला आहे, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.२४ टक्के आणि कला शाखेचा निकाल ८१.८१ टक्के इतका लागला आहे. या उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या परीक्षेत कु. नुपुर संदीप नवरत हिने ८७.५० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात तसेच कला शाखेत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत नुपुर नवरत हिने प्रथम क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेत कु. पुर्वा महेश रामाने हिने ६९.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर विज्ञान शाखेत श्रेयस कौस्तुभ रानडे याने ७०.१७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्वाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर तसेच सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे महाविद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या वेदिका राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. संतोष येसावरे, प्रा. रेश्मा तांबे, प्रा. स्मिता बैकर, प्रा. विद्याधर बेंडखळे, प्रा. क्षितिजा गोडबोले, प्रा. विभावरी गमरे, प्रा. निलेश तेरेदेसाई, प्रा. रुपेश तांबे, प्रा. समीर लवाटे, प्रा. प्रीती सकपाळ आणि प्रा. अंकिता दळवी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून या यशात मोलाचा वाटा उचलला.
महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













