Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : पूज्य साने गुरुजी पालगड विद्यालयाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले

banner 468x60

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर, पालगड (साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी संचलित) येथील १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथे पार पडली. उत्कृष्ट खेळ करत मुलींनी अंतिम फेरीत विजय मिळवला व शाळेच्या नावलौकिकात भर घातली. विजेत्या संघाला आता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्पर्धेत करण्याची संधी मिळाली आहे.

संघाचे नेतृत्व कुमारी मान्यता गौरत हिने केले. तर वृद्धी चव्हाण, रिया गणवे, मनस्वी जामकर, आकांक्षा मोहिते, निधी कोशिमकर, देवयानी गोलीपकर, नंदिनी कोशिमकर या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी बजावली. संघाला मार्गदर्शक शिक्षिका. मंजिरी शितुत व मार्गदर्शक शिक्षक. दत्तप्रसाद गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद पावशे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्मा. शरद रावजी केळकर, उपाध्यक्ष डॉ. अशोक करंदीकर, गुरव सर आणि आठले मॅडम सचिव डॉ. मकरंद करमरकर व संचालक मंडळ यांनी विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *