दापोली शहरातील आझाद मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्य बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात, मंगळवारी (१६ जून) रात्री साडेआठच्या सुमारास आझाद मैदान येथे प्रतिक प्रकाश धामणे (वय २७, रा. आसूद कामरेवाडी, ता. दापोली) हा सार्वजनिक ठिकाणी रॉयल स्टॅग ही विदेशी मद्याची बाटली ताब्यात बाळगताना आढळून आला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात, त्याच दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान परिसरात किरण हरि नाचरे (वय ४१, रा. बरजे गल्ली, दापोली) हा मॅकडॉवेल्स नं. १ ही विदेशी मद्याची बाटली ताब्यात बाळगताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १२५/२०२६ नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कैलास क्षिरसागर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













