दापोली शहरातील नवानगर येथे ७९ वर्षीय वृद्धाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसिंग गणपतराव राजेशिर्के (वय ७९, रा. नवानगर, दापोली) यांनी आपल्या राहत्या घराच्या अंगणाच्या पुढील बाजूस विहिरीलगत असलेल्या पंपाच्या शेडमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाने व नातेवाईकांनी त्यांना या अवस्थेत पाहिले.
त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या गळ्यातील दोरी काढून त्यांना घरात आणले. रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध न झाल्याने डॉक्टर सूरज राठोड यांना घरी बोलावण्यात आले. त्यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मानसिंग राजेशिर्के यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













