दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये नजीर वलेले यांचा सत्कार

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी नजीर अली वलेले यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी नजीर अली वलेले हे होते. मुस्तकिम मुकादम याने कुराण पठण केले. शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी नजीर वलेले यांचे स्वागत करताना प्रास्ताविक केले. जमादार सर व परकार सर यांनी नजीर अली वलेले यांच्याबद्दल माहिती सांगीतली.

पंचायत समिती दापोली येथे नजीर वलेले यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी नजीर वलेले यांच्या शैक्षणिक सेवा वर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात नजीर वलेले यांनी उर्दू माध्यम शिक्षणाचे महत्त्व व शिक्षकाची गुणवत्ता यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम सूत्रसंचालन जमादार सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम व पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *