दापोली : नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा दहावीचा निकाल 100 टक्के, जिया जमीर जमादार प्रथम तर शिफा चिपळूणकर द्वितीय

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत प्रशालेतील सर्व ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

banner 728x90

या परीक्षेत जिया जमीर जमादार हिने ९४.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला शिफा जमीर चिपळूणकर हिने ९१.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर नौफ शौकत कोंडविलकर हिने ८८.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.

निकालाच्या एकूण गुणवत्तेकडे पाहता, १८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ३१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली असून एक विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नजीर पठाण, गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष आरिफ मेमन तसेच मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


विद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य हे महत्त्वाचे घटक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *