Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : मासेमारी करताना बुडून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील इनामपांगारी गावाजवळील नदीपात्रात ५८ वर्षीय फैजअली म्हामुद नांदगावकर यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

banner 728x90

प्राथमिक माहितीनुसार, मासेमारी करताना बुडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
८ ऑगस्ट रोजी दुपारी ते मासेमारीसाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना सापडला .


दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे इनामपांगारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *