Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : कोळंबा आळी परिसराततील सेफ्टी टँकचा स्फोट तीन इमारतीला धोका

banner 468x60

दापोली शहरातील कोळंबा आळी परिसरात रविवारी मध्यरात्री एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणावर मैला वाहून पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत पोहोचला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

banner 728x90


डोंगर उत्खनन करून उभारण्यात आलेल्या तीन सदनिकांच्या या इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. चुकीचे बांधकाम केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर इमारतीचे संरचनात्मक स्थैर्य धोक्यात असल्याने ती कोसळण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. ही इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या इमारतीच्या सुरक्षेची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा कृपा घाग यांनी धोकादायक इमारतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून कठोर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *