Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांचा दापोली आगाराकडून सत्कार

banner 468x60

कोकण कट्टा न्यूज हे दापोली आणि कोकणातील लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे. दापोलीतल्या आणि कोकणातील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम कोकण कट्टा न्यूज करत आहे.

कोकण कट्टा न्यूजचे दापोली प्रतिनिधी सलीम रखांगे यांचा दापोली आगाराकडून सत्कार करण्यात आला आहे. सलीम रखांगे हे दापोलीतील ज्वलंत मुद्दे, प्रश्न कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून मांडत आले आहेत.

दापोली आगारामध्ये 28 संप्टेंबर रोजी आंतर राष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सलीम रखांगे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहिली.

कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलंय . दापोलीआगाराच्या वतीने सलीम रखांगे यांचं पुष्पगुच्च देऊन स्वागत करण्यात आलं आहे

.या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापिका मधाळे, सहाय्यक कार्यशाळा अधिकारी, राजापकर वाहतूक निरीक्षक नाफडे तसेच प्रशासकीय कर्मचारी ,चालक वाहक,यांत्रिक कर्मचारी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *