दापोली : खाडीत बुडून 52 वर्षीय प्रौढाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील पांगारी विठ्ठलवाडी येथील रहिवासी अशोक जाधव यांचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार 3 ऑगस्ट रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जाधव 30 जुलैला सायंकाळी 7.30च्या सुमारास पांगारी जेटी येथे गेले होते.

तेथून ते पुन्हा घरी न आल्याने शोधाशोध सुरू होती. कुठेही आढळून न आल्यामुळे दापोली पोलिसात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.

3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पांगारी वाघ शेपटी येथे खाडीकिनारी अशोक जाधव यांचा मृतदेह आढळला. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *