युवकांचे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी JCI Dapoli आणि Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम संयुक्तपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कराराअंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रम, युवक सक्षमीकरण, समाजसेवा प्रकल्प, सामाजिक विकास मोहिमा तसेच विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
कराराच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू Dr. Sanjay Bhave यांच्यासह डॉ. विनायक जालगावकर, डॉ. नारखेडे, डॉ. राणे, डॉ. ठोकळ, डॉ. धांडे आणि डॉ. त्रिपाठी उपस्थित होते. या उपक्रमासाठी विद्यापीठ प्रशासन व प्राध्यापकवर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल जेसीआय दापोलीतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक, खजिनदार सीए ऋषिकेश शेठ तसेच भूषण इसवलकर, अभिषेक खटावकर, तेजस मेहता, मयुरेश शेठ, स्वप्नील मेहता, ओंकार कर्वे, ऋषी तलाठी आणि अनिकेत खानविलकर उपस्थित होते.
“समुदाय विकासासाठी नेतृत्व” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन जेसीआय दापोली आणि कोकण कृषी विद्यापीठ समाजहितासाठी विविध उपक्रम संयुक्तपणे राबविणार असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि सेवाभाव रुजविण्यास ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











