Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : हृदयविकाराच्या झटक्याने 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील टेटेवली ब्राम्हणवाडी येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या त्रासामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुष्मिता बिसाल मगर असे मृत मुलीचे नाव असून, ती मूळची नेपाळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

banner 728x90

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता हिला लहानपणापासूनच हृदयविकाराचा त्रास होता. तिच्यावर सन २०१४ मध्ये हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती अधूनमधून बिघडत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

रविवार दिनांक ११ मे रोजी तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. प्रकृती ठीक नसल्यामुळे तिने दिवसभर अन्नही घेतले नव्हते. रात्री उशिरापर्यंत तिची प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबीय तिच्यावर लक्ष ठेवून होते.

दरम्यान, रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास तिचे वडील बिसाल रमेश मगर यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला असता ती कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलगी प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी घाबरून तिला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पहाटे ३.५६ वाजता तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी वैद्यकीय अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *