Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : हर्णे बाजारपेठेत वृद्ध महिलेसह नातीवर दांडक्याने हल्ला, एक जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथे कौटुंबिक वादातून ७५ वर्षीय वृद्ध महिला व तिच्या अल्पवयीन नातीवर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी (दि. ५ जून) दुपारी घडली. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री रमेश भंडारे (वय ७५, रा. हर्णे बाजारपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसागर सुरेश भंडारे (वय ३५, रा. हर्णे बाजारपेठ) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२), ३३२(ग), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या वेळी जयश्री भंडारे या आपल्या घरातील हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी शिवसागर भंडारे हा शिवीगाळ करत हातात लाकडी दांडका घेऊन घरात घुसला. त्याने “तुला आत्ता जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर दांडक्याने जोरदार प्रहार केला. त्यानंतर डाव्या व उजव्या हातावर तसेच कंबरेवर वारंवार मारहाण करून गंभीर दुखापत केली.

या हल्ल्यात जयश्री भंडारे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेली त्यांची नात महेक किशोर भंडारे (वय १६) हिलाही आरोपीने दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या जयश्री भंडारे यांच्यावर उपचार सुरू असून दापोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *