दापोली : ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीचा दहावी निकाल 100 टक्के, नित्या रवींद्र गायकर हिने 99 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला

banner 468x60

दापोली : ज्ञानदीप दापोली संचलित ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली या प्रशालेने एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशालेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेसह दापोली परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

banner 728x90

या परीक्षेत नित्या रवींद्र गायकर हिने ९९.०० टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. जान्हवी मोरे हिने ९४.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अथर्व पांडुरंग इंदलकर याने ९३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यंदाच्या निकालात ४१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ११ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली असून २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६८ विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरले.

या यशाबद्दल संस्था अध्यक्षा सरोज मेहता, सेक्रेटरी सुजय मेहता, संस्था संचालक हसमुख जैन, विश्वास काका कदम, रवींद्र कालेकर, सुयोग मेहता, संकेत मेहता, सुहासिनी कोपरकर तसेच मेहता परिवारातील सर्व सदस्य, संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मोरे, शिक्षक प्रतिनिधी राजाराम सोपान चौगुले, शिक्षकेतर प्रतिनिधी सचिन इदाते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *