Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

दापोली : घरातील दागिने आणि रोख रकमेची चोरी

banner 468x60

दापोली येथील करंजाळी-फणसू गावात चोरी झाली असून
स्वयंपाक खोलीच्या भिंतीवरून बेडरूममध्ये प्रवेश करून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना करंजाळी (ता. दापोली) येथे घडली.

चोरट्याने एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी घरातील कामगाराने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमध्ये एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.


चव्हाण यांनी या चोरीत घरातील कामगाराचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या चोरीबाबत निवेदिता सुधाकर चव्हाण (वय ३५, रा. करंजाळी- फणसू दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही चोरी १४ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत झाली आहे. ही चोरी कामगाराने केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

त्याने स्वयंपाक खोलीच्या भिंतीवरून बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर पर्समधील चावी काढून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या चोरीत ४९,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २००० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *