Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : चहा आणि नाश्ता बनवण्यास उशीर झाल्याने पत्नीला कुकरने मारहाण, पती मुनिफ खलपे विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छोट्या कारणावरून पत्नीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे रमजान सारखा पवित्र महिना चालू असताना पतीने पत्नीला मारहाण केली आहे.

चहा आणि नाश्ता बनवण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना दापोली शहरातील नॅशनल हायस्कूलजवळील असिया प्लाझा येथे घडली आहे. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, असमा मुनिफ खलपे (वय ३४) या १० मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घरी काम करत असताना त्यांचे पती मुनिफ अब्दुलगनी खलपे यांनी त्यांना चहा व पाव फ्राय बनवून देण्यास सांगितले. असमा यांनी चहा व नाश्ता दिल्यानंतरही पाव फ्राय उशिरा का दिला, या कारणावरून मुनिफ यांनी संताप व्यक्त करत पत्नीला शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर रागाच्या भरात त्यांनी स्वयंपाकघरातील कुकर उचलून असमा यांच्या पाठीवर तीन ते चार वेळा जोरात प्रहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत असमा यांच्या पाठीवर मुका मार लागून त्यांना दुखापत झाली.

घटनेनंतर असमा यांनी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे वैद्यकीय तपासणी करून १२ मार्च रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या पतीचा स्वभाव रागीट असून तो नेहमी विनाकारण त्रास देत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *