Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : घृणास्पद मेलेल्या कासवाला फाशी दिली, वनविभाग अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवाला मारून झाडाला टांगून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मृत कासवाला

दापोली येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आणून तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून त्याचे दहन केल्याची माहिती दापोली वनविभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

कांदळवन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एका झाडाला पूर्ण वाढ झालेले मोठे (नर) कासव टांगून ठेवलेल्या स्थितीत आढळले आहे

दापोली कांदळवन विभागाकडून आणि पशुवैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कासव २६ मेपूर्वी सुमारे पंधरा दिवस मृत झाले असावे आणि अनोळखीने त्याला झाडाला टांगून ठेवले असावे.

त्याच्या शरीरातील सर्व मांसल भाग निघून गेला होता. फक्त पाठीचा कडक भाग शिल्लक राहिल्याचे पंचनामावेळी दिसून आले.

याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे; मात्र हे कासव मृत झाल्यानंतर कोणीतरी टांगून ठेवले असावे, असा निष्कर्ष कांदळवन विभागाने काढला आहे,

अशी माहिती संबंधित विभागाने दिली. कासव मृतावस्थेत आढळले असताना त्याला झाडाला टांगून कोणी आणि का ठेवले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

मांजर, कुत्रे किंवा एखादा पक्षी मृतावस्थेत आढळला तर त्याला पुरून टाकण्याची पद्धत आहे; मात्र या कासवाबाबत असे न होता झाडाला टांगून ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दापोली तालुक्यात एक महिन्यापूर्वी टेटवली गावात मगर अर्धवट जळलेल्या स्थितीत आढळली होती. तालुक्यात माशांच्या उलटीची होणारी तस्करी, खवल्या मांजराची तस्करी, बिबट्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना, क्रूरपणे मगरीला जाळून मारल्याची घटना आणि आता कासवाला झाडाला टांगून ठेवल्याची घटना समोर आल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *