Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

दापोली : दापोलीत कचऱ्याचं साम्राज्य, डम्पिंग ग्राउंडची दुर्दशा, प्रशासनाचं दुर्लक्ष

banner 468x60

दापोली शहरालगत नगरपंचायत हद्दीतील असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकण्याकरिता जागा उरलेली नाही. डम्पिंग ग्राउंडची दमछाक होत आहे.

banner 728x90

डम्पिंग ग्राउंडचा श्वास कोंडत आहे. डम्पिंग ग्राउंडमध्ये कचर्‍याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचर्‍यामुळे बरीच दुर्गंधी पसरलेली आहे.

डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी राहणार्‍या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तरी या सर्व रहिवाशांनी आपली नाराजीची कैफियत मांडली आहे.

तरी याबाबत ताबडतोब नगरपंचायतने त्या कचर्‍याची विल्हेवाट लावून व्यवस्थित स्वच्छता करावी आणि जेसीबी आणून कचरा व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून होणारी दुर्गंधी थांबवावी व होणार्‍या आरोग्यास धोका टाळावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *