Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : चारचाकी गाडी अपहार प्रकरण, गाडी भाड्याने घेऊन गायब झालेल्या चालकाला अटक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील निगडे गोठणवाडी परिसरात विश्वास संपादन करून चारचाकी वाहन अपहार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने भाडेतत्त्वावर घेतलेली गाडी ठरलेल्या वेळेत परत न करता स्वतःच्या वापरासाठी ठेवून दिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

banner 728x90

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय रेवाळे (वय 30, व्यवसाय – चालक, रा. निगडे गोठणवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी आपली इर्टिगा (MH 14 FX 2768) ही चारचाकी गाडी आरोपी नरेश भागोजी सणस (रा. मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी) याला भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिली होती. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून गाडी ताब्यात घेतली होती.

दि. 8 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता गाडी देण्यात आली होती. करारानुसार ही गाडी दि. 20 एप्रिल 2026 रोजी परत करणे अपेक्षित होते. मात्र, आरोपीने गाडी परत न करता ती स्वतःकडेच ठेवली. वारंवार संपर्क करूनही गाडी परत मिळाली नाही, तसेच आरोपीने टाळाटाळ केल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

दि. 25 एप्रिल 2026 पर्यंत ही बाब कायम राहिल्यानंतर फिर्यादीने अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 74/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316 (2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा दि. 27 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.06 वाजता दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निर्मळ यांच्याकडे सोपविण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहन मालकांनी भाडेतत्त्वावर वाहन देताना आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रे व करार प्रक्रिया पूर्ण करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *