Breaking News
दापोली : काजूच्या बागेला आग, 720 झाडांसह पाइपलाइन जळून खाक, आठ एकरांतील बागेचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे 15 लाख रुपयांची वित्तहानी रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागाच्या ‘भोंगळ’ कारभाराविरोधात उपोषण, लाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू रत्नागिरी : दंड भरल्याचा बनावट ई-चलन मेसेज पाठवून मोबाईल हॅक, दोन बँक खात्यांतून 6.29 लाख लंपास रत्नागिरी : अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात रत्नागिरी पोलिसांना यश, हत्येप्रकरणी मृताचा वडील आणि भाऊ पोलीस कोठडीत रत्नागिरी : देवघरातील दिव्यामुळे घराला भीषण आग, सुवरे कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

दापोली : काजूच्या बागेला आग, 720 झाडांसह पाइपलाइन जळून खाक, आठ एकरांतील बागेचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे 15 लाख रुपयांची वित्तहानी

banner 468x60

दापोली तालुक्यातील कुंभवे येथील सुमारे आठ एकर क्षेत्रातील काजूच्या बागेला आग लागून ७२० काजूची झाडे आणि झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली पीव्हीसी पाइपलाइन जळून नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद गोविंद रुके (वय ५२, सध्या रा. साखळोली, ता. दापोली, मूळ रा. लिपणीवावे, ता. म्हसळा, जि. रायगड) हे हेमंत नामदेवराव नगराळे यांच्या मालकीच्या कुंभवे येथील काजूच्या बागेत देखभालीचे काम करतात. त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता बागेची पाहणी केली होती. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते पुन्हा बागेत देखभालीच्या कामासाठी गेले असता त्यांना बागेतील वाळलेले गवत जळालेल्या अवस्थेत दिसून आले.


त्यानंतर त्यांनी संपूर्ण बागेची पाहणी केली असता आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे आठ एकर क्षेत्रात लागवड केलेली १५ वर्षे जुनी ७२० काजूची झाडे आगीत होरपळली होती. तसेच झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली पीव्हीसी पाइपलाइनही पूर्णपणे जळाल्याचे दिसून आले.


बागेतील वाळलेल्या गवताला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या आगीत सुमारे १० लाख रुपये किंमतीची काजूची झाडे आणि पाच लाख रुपये किमतीची पाइपलाइन असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


याप्रकरणी दयानंद रुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२६(एफ) आणि भारतीय दंड विधान कलम ४३५ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि आग कोणी लावली, याचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे बागेच्या मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, १५ वर्षे जपलेल्या काजूच्या बागेचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.