Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : बीएससी हॉर्टिकल्चर परीक्षेत मरियम वाडकरचे घवघवीत यश, विद्यापीठात द्वितीय क्रमांक

banner 468x60

दापोली तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या बीएससी हॉर्टिकल्चर (उद्यानविद्या) पदवी परीक्षेत कोकणातील सुप्रसिद्ध सामाजिक व शैक्षणिक व्यक्तिमत्त्व मुनाफ वाडकर यांची सुकन्या कु. मरियम मुनाफ वाडकर हिने दैदीप्यमान यश संपादन करत विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. मरियमने या परीक्षेत तब्बल ८५.२ टक्के गुणांसह (सीजीपीए) उल्लेखनीय कामगिरी नोंदवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण कोकणाचे नाव उज्ज्वल केले आहे.

banner 728x90


मरियमच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या या यशामुळे ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.


आपल्या यशाबद्दल बोलताना मरियमने आई-वडील, कुटुंबीय आणि शिक्षक यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे तिने नमूद केले. विद्यार्थीदशेपासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि संशोधनाची आवड असलेल्या मरियमने उद्यानविद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.


सध्या मरियम याच विषयात पदव्युत्तर (मास्टर्स) शिक्षण घेत असून भविष्यात ‘लँडस्केप प्लॅनिंग, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास’ या क्षेत्रात संशोधन व प्रत्यक्ष काम करून समाजासाठी योगदान देण्याचा तिचा मानस आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय आव्हाने आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या विषयांमध्ये तिला विशेष रस असून या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.


मरियमच्या या यशामुळे वाडकर कुटुंबाचा अभिमान उंचावला असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हितचिंतक, मित्रपरिवार, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या आगामी वाटचालीतही ती अशीच यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *