Breaking News
रत्नागिरी : कुवारबाव येथे तीन डंपरची धडक, ब्रेक फेल झाल्याने अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक होऊन महिना उलटला, अवजड वाहतूक अद्याप बंदच, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती, तरी निर्णय रखडला; प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश

दापोली : अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची धमकी

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर मोहल्ला गावामध्ये एका अल्पवयीन मुलीला त्रास देऊन पळवून नेण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

banner 728x90


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील बुरोंडी गावात बंदर मोहल्लामधील एका 14 वर्षीय मुलीला 2023 पासून तिच्याच गावातील ओळखीचा व्यक्ती हा सातत्याने त्रास देत होता.

मुलीच्या मोबाईलवर त्रास देणारे मेसेज करीत होता . अल्पवयीन मुलीला शाळेतून येता जाता त्रास देत होता. अखेर पाच जानेवारीला या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या घरावर दगड मारून वेडेवाकडे हातवारे करून मुलीला पळवून नेतो अशी धमकी देण्यात आली.

हा सर्व प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितलं असता पालकांनी दापोली पोलिसात तक्रार दिली आहे.

दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.31/2025 भा.न्या. सं 2023 चे कलम 78,351(2), सह 2012 चे कलम 12 प्रमाणे बालकाचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोउनि यादव याबाबतचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *