Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण 100 टक्के गुणांसह दापोलीत प्रथम

banner 468x60

ए.जी. हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एसएससी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील विद्यार्थिनी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने तब्बल १०० टक्के गुण मिळवत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90


यंदा विद्यालयातून एकूण २६२ विद्यार्थी एसएससी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९७.३२ टक्के लागला आहे. सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत नील उदय फडके याने ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. क्रांति विरेंद्र केळस्कर हिने ९५.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच पल्लवी विजय भुवड हिने ९४.८० टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला, तर सई आशिष शिगवण हिने ९४.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला.


विशेष बाब म्हणजे विद्यालयातील तब्बल ४८ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रसाद करमरकर, कार्यवाह विनोद जोशी, संचालक मंडळ, शालेय समितीचे चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर व स्मिता सुर्वे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेठकर, एस.आय. मगदूम, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *