Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

दापोली : आंजर्ले समुद्र किनारी बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यात यश

banner 468x60

दापोली आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर नव्याने सुरु झालेल्या बीच ऍक्टिवीटीमुळे समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे.रविवार दिनांक १६ मार्च रोजी पहाटे समुद्रात काही पर्यटक पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एक पर्यटक बुडू लागला होता.

सोबतच्या पर्यटकानी समुद्रालग असलेल्या मकरंद महादलेकर यांना माहिती दिलीया असता त्यांनी माजी सरपंच संदेश देवकर यांना फोन करून कल्पना दिली संदेश देवकर हे मुंबईत असून देखील त्यांनी तत्काळ बाळा केळसकर यांना संपर्क केला.

दरम्यान या सर्वानी एका ही क्षणाचा वीलंब न करता सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत.

सूरज रहाटवळ आणि त्याच्या सहकार्यानी तत्परता दाखवत हे साहसी काम केलं आहे.समुद्रकिनारी समुद्र दर्शनासाठी हजर असलेल्या बोटीमुळेच हे शक्य झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मदत करणाऱ्या सर्वांचे गावातून सर्वे थरातून कौतुक केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *