दापोली : 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 0 ते 5 वर्षांतील बालकांना डोस देण्याचे आवाहन

banner 468x60

दापोली आरोग्य विभागाच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येणार असून तालुक्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक ‘दोन थेंब’ डोस देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील ६ हजार १४१ बालकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात १६८ बूथ उभारण्यात आले आहेत. हे बूथ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार असून पालकांनी आपल्या नजीकच्या बूथवर बालकांना घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने ३४६ कर्मचारी आणि ३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य विभागाचे पथक अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत राहणार आहे.

“पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पात्र बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. पालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या बालकांना डोस पाजावा,” असे आवाहन डॉ. अमित वंजारे यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने सर्व पालकांना आपल्या बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *