Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दाभोळच्या जि.प. कन्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव, चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

banner 468x60

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जि.प. कन्या शाळा, दाभोळ येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने झाली. त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे पहिले पाऊल उत्साहात घेण्यात आले.

या प्रसंगी उंबरे केंद्राच्या केंद्रप्रमुख शुभांगी शिगवण, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शशिकांत भिकू राणे, शिक्षणतज्ज्ञ प्रशांत दिनकर यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शशिकांत भिकू राणे यांनी सर्व विद्यार्थिनींना पेन आणि पेन्सिल भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मध्यान्ह भोजनात विद्यार्थिनींना मटार पुलाव व जिलेबी देण्यात आली. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये शाळेविषयी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत दाभोळ येथील जि.प. कन्या शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *